आंब्रळ ( ता. महाबळेश्वर ) येथील नामदेव भिलारे यांची वाई येथील ऐका बिल्डर कडून फसवणूक : वाई पोलिसात तक्रार
भिलार : आंब्रळ ( ता. महाबळेश्वर ) येथील नामदेव भिलारे यांची वाई येथील ऐका बिल्डर कडून फसवणूक झाली असून याबाबत भिलारे यांनी या बिल्डर विरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत नामदेव भिलारे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली याबाबत अधिक माहिती अशी की भिलारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की आंब्रळ (
भिलार : आंब्रळ ( ता. महाबळेश्वर ) येथील नामदेव भिलारे यांची वाई येथील ऐका बिल्डर कडून फसवणूक झाली असून याबाबत भिलारे यांनी या बिल्डर विरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत नामदेव भिलारे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली
याबाबत अधिक माहिती अशी की भिलारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की आंब्रळ ( ता. महाबळेश्वर ) येथील नामदेव रामचंद्र भिलारे यांनी वाई येथील पृथ्वी कांस्ट्रशन यांचेकडे जेजुरीकर कॉलनी सिद्ध नाथ वाडी येथील गट नंबर १११ ब /१ ब या मिळकती मध्ये कृष्णा काठ या अपार्टमेंट मधील ८ नंबरची सदनिका १७,३५,००० रुपये किमतीमध्ये घेण्याचा ठराव झाला. त्यानंतर २४/११/२०१६ रोजी या सदनिकांची कागदोपत्री व्यवहार करून वेळोवेळी १० लाख रुपये पोहोच केले. याचा ताबा डिसेंबर २०१७ मध्ये देण्याचा ठराव झाला परंतु हे बांधकाम ठप्प होते २०१७ नंतरही काहीच काम होत नव्हते म्हणून मी याबाबत विचारणा केली असता याचे मालक अर्जुन सनस हे उडवाउडवीची उत्तरे देवू लागले त्यामुळे मला त्यांच्या हेतूविषयी शंका आली म्हणून त्यांना पैसे पुनः परत देण्याविषयी सांगितले त्यावर त्यांनी मला मी तुमचे पैसे व्याजासह ११ लाख रुपये देतो असे सांगितले वारंवार मी मागणी केल्यावर त्यांनी त्यातील ६ लाख रुपये दिले परंतु अद्याप त्यांचेकडून मला ५ लाख रुपये मिळाले नाहीत आज या गोष्टीला पाच वर्ष उलटले तरी ते पैसे देत नसल्याने मी हतबल झालो असून सध्या माझी तब्बेतही साथ देत नसल्याने मी वकीलाकडून त्यांना नोटीस बजावली परंतु त्यांनी एकही नोटीस स्विकारले नाही त्यामुळे त्याने फोनवरून मला सांगितले पैशासाठी मला सारखी पत्रे पाठवू नका तुमचे पैसे मला देता येणे शक्य नाही तुम्हाला काय करायचे ते करा पैसे कसे वसूल करायचे ते करा असे सांगितले.
व ही मिळकत अर्जुन सणस यांनी परस्पर दुसऱ्या व्यक्तीला २६/६/२०२० रोजी करार करून विकली आहे. त्यामुळें माझी त्यांनी आर्थिक व कागदोपत्री फसवणूक केली आहे. यामुळे माझी फसवणूक झाली असल्याचे भिलारे यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित अर्जुन रामचंद्र सणस यांचे विरुद्ध भारतीय दंड विधान कायद्याचे कलम ४२०, ४२३,४६४, ४६८, ४७० प्रमाणे गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे तक्रारीत शेवटी म्हंटले आहे.
Comment List